बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

तुला पाहीले मी, नदीच्या किनारी - रणजित पराडकर



रणजित पराडकर
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
माझी मला अन्तुला सावली

गीतकार : ग्रेस
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
 
गीतकार : ग्रेस  
गायक : सुरेश वाडकर  
संगीतकार : श्रीधर फडके  
गीतसंग्रह/नाटक : ऋतू हिरवा



९ टिप्पण्या:

  1. रणजित, खुप छान, खुपच छान गायलायस! खर्ज आणि टिपेला दोन्हीकडे फार सुरेख पोचलायस. माझं आवडतं गाणं आहे. थँक्स :-)

    उत्तर द्याहटवा