संकल्पना ...

नमस्कार मंडळी !

माझ्याकडे असंख्य कॅराओके म्युझीक ट्रॆक्स आहेत. या आवडीतूनच काही समव्यसनी (गाण्याच्या संदर्भात) मित्रांच्या सोबतीने आम्ही व्हॉट्सअॅप वरती "कॅराओके क्लब" या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपमधील गायक कलाकारांनी गायलेल्या गाण्यांचे हे सादरीकरण. हे सर्व कलाकार अजूनही "हौशी कलावंत" असल्याने ही गाणी व्यावसायिक पद्धतीने रेकॉर्ड करण्याऐवजी घरगूती रेकॉर्डींग्जच आहेत आणि ती तशीच असण्यातली मजा तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. श्रोत्यांची दाद, त्यांच्या टिप्पण्या कलाकाराचा हुरूप वाढवत असतात. मला आशा आहे, या कलाकारांनाही भरघोस प्रतिसाद मिळेल. आणि याच्यातूनच एखादा दिग्गज जन्माला येईल.

नुसती गाणीच नव्हे तर त्यांचे शब्द, गायकाचे नाव, संगीतकार, गीतकार आणि चित्रपटाचे नाव सुद्धा ईथे तुम्हाला मिळेल. याव्दारे जर कुणाला आपणही गाणी गावी अशी ईच्छा झाली तर त्यांनी मला संपर्क करावा. मी या प्रकारच्या गाण्यांचा प्रचारक आहे असं समजलंत तरी चालेल. जे माझ्याकडे आहे त्याचा आनंद दुसर्‍यांनी घेतलेला मला जास्त आवडतो.

धन्यवाद !


शैलेंद्र रघूनाथ साठे, शहापूर, जि.ठाणे

८ टिप्पण्या:

  1. क्या बात है, दादा !

    निव्वळ ग्रेट.........!!

    उत्तर द्याहटवा
  2. संकल्पना आवडली. हौशी कलाकारांसाठी चांगला उपक्रम!

    उत्तर द्याहटवा
  3. शक्य असल्यास माझे खालील लिंक वरील गाणे समाविष्ट करा
    http://kavyarangmaze.blogspot.in/2012/01/blog-post.html

    उत्तर द्याहटवा