बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

लहरोंकी तरह यादें - रणजित पराडकर




रणजित पराडकर
लहरों की तरह यादें, दिल से टकराती हैं
तूफ़ान उठाती हैं

किस्मत में है, घोर अँधेरे
राते सुलगती, धूंदले सवेरे

तकते तकते, सूनी राहें
पथरा गयी है, अब तो निगाहें

गायक : किशोर कुमार
बरसों से दिल पे, बोज़ उठाए
ढूंढ रहा हूँ, प्यार के साए
संगीतकार : राजेश रोशन
**************************** 

या गाण्यामागे गायकाची भावना स्वतः रणजित पराडकर यांच्या शब्दात -

'लहरों की तरह यादें..'
साधारण १२-१४ वर्षांपूर्वी मी जेव्हा गोव्याला माझा मालवाहतुकीचा व्यवसाय (कसाबसा) करत होतो, तेव्हा मी मडगाव-फोंडा-मडगाव असं रोज स्कूटरने जात असे. सकाळी आठला जात असे, रात्री येईपर्यंत साडे नऊ वगैरे होत. एकदा असाच मी फोंड्याहून परत मडगांवला यायला निघालो होतो. रात्रीचे नऊ वगैरे वाजले असावेत. एक डोंगरातून आणि दाट झाडीतून उतरणारा वळणदार सुंदर रस्ता होता. त्यांतल्या एका वळणावर एक पेट्रोल पंप होता, जिथे मी नेहमी पेट्रोल भरायचो. त्या दिवशीही थांबलो. भारत पेट्रोलियमचा होता तो. पंपावरच्या ओव्हरहेड स्पीकर्सवर खणखणीत आवाजात एफएम चालू होतं आणि माझ्या कानांवर मी पंपात शिरल्याबरोबर किशोरचा आवाज पडला. पंपावर इतर १-२ गाड्या होत्या, माझा नंबर लगेच लागला. मी पेट्रोल भरलं. पैसे दिले. स्कूटर पुढे घेतली. पण हे सगळं करत असताना लक्ष किशोरकडे होतं. कारण ते गाणं मी ह्यापूर्वी ऐकलेलंच नव्हतं. स्कूटर जरा बाजूला घेऊन मी पूर्ण गाणं तिथेच उभं राहून ऐकलं. सभोवताली नीरव शांतता. हवाहवासा गारवा. दाट झाडी, तो टुमदार पेट्रोल पंप आणि किशोर... I desperately wanted a drink in my hand.. पण ते तेव्हा शक्य नव्हतं. गाणं संपलं. I desperately wanted a ONCE MORE, पण तेही शक्य नव्हतं.
त्या वेळी मोबाईलवर इंटरनेट नव्हतं. मोबाईलवर काय, ऑफिसातही नव्हतं. मग मी दुसऱ्या दिवशी इंटरनेट कॅफेत गेलो आणि हे गाणं शोधलं. ते मोबाईलमध्ये घातलं. पुढे कित्येक दिवस ह्या गाण्याचं गारुड होतं, आजही आहेच.
तसं ऐकायला साधंच गाणं आहे. तीच ती चाल आहे आणि तीसुद्धा छोटीशीच. सगळं गाणं मिळून वहीचं अर्धं पानही भरणार नाही. किशोरची ह्याहून सुंदर अनेक गाणी आहेत. राजेश रोशनचीही अजून अनेक मेलोडियस गाणी आहेत. पण हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्याने जो माहोल बनवला होता, तो माझ्या मनात प्रत्येक वेळी दाटून येतो. एका अतिशय vulnerable मनस्थितीत मी हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा जी जादू झाली होती, ती मी शब्दांत सांगू शकत नाही. For no apparent reason, हे गाणं माझं अत्यंत लाडकं गाणं आहे. इतकं की, ......काय सांगू आता..??
लहरों की तरह यादें.....  
चित्रपट : निशान



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा